Kiran Lahamte : आमदार लहामटेंचा घाटघर आश्रमशाळेत मुक्काम

Kiran Lahamte : आमदार लहामटेंचा घाटघर आश्रमशाळेत मुक्काम

0
Kiran Lahamte : आमदार लहामटेंचा घाटघर आश्रमशाळेत मुक्काम
Kiran Lahamte : आमदार लहामटेंचा घाटघर आश्रमशाळेत मुक्काम

Kiran Lahamte : अकोले : ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियान अंतर्गत अकोल्याचे (Akole) आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी घाटघर येथील आश्रमशाळा (Ashramshala) व वसतिगृहात नुकताच मुक्काम करून त्यांच्याशी संवाद साधत समस्या देखील जाणून घेतल्या.

नक्की वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिला अपात्र

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद

राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहात ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियान सुरू करण्यात आलेले आहे. या अभियाना अंतर्गत आमदार डॉ. लहामटे यांनी घाटघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. याचबरोबर त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत तेथील सुविधांची पाहणी केली. 

अवश्य वाचा : शेवगाव येथील मंदिर सेवेकऱ्याच्या हत्येची उकल

त्यांच्यासोबतच केला मुक्काम (Kiran Lahamte)

विशेष म्हणजे त्यांच्यासोबत ते खात असलेल्या जेवणाचा आस्वादही घेतला आणि त्यांच्यासोबतच मुक्काम केला. आश्रमशाळेच्या दर्जेदार इमारतीसोबतच शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही आमदार लहामटे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.