Kiran Lahamte : अकोले : येत्या पंधरा दिवसांत अवैध दारू धंद्यांवर (Illegal liquor business) कारवाई नाही झाली तर हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) व मी स्वतः धरणे आंदोलनास बसेल, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी दिला.
नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय
तालुक्यातून दारू हद्दपार व्हावी, या उद्देशाने बैठक
अकोले पंचायत समिती येथे सोमवारी (ता.5) अवैध दारू विक्रीविषयी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातून दारू हद्दपार व्हावी, या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी अत्यंत पोटतिडकीने सूचना मांडल्या.
अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन
यावेळी बोलताना आमदार लहामटे म्हणाले, (Kiran Lahamte)
येत्या पंधरा दिवसांत अवैध दारू धंद्यांवर कारवाई नाही झाली तर हेरंब कुलकर्णी व मी स्वतः धरणे आंदोलनास बसेल. याचबरोबर अवैध दारू सोबत परवानाधारक दारू दुकानदारांनी परवाना असणाऱ्या व्यक्तीसच दारू, द्यावी अशा सूचना दिल्या. तसेच आपल्या गावात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या दारूच्या अड्डयांविषयी माहिती आम्हाला द्यावी, असे आवाहन केले. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहस्रबुद्धे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने, कृषी अधिकारी विकास चौरे, विनय सावंत, अक्षय आभाळे, वसंत मनकर, सुरेश नवले, प्रकाश नाईकवाडी, अविनाश कानवडे, सुनील उगले आदी उपस्थित होते.