Laapataa Ladies:किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

0
Laapataa Ladies:किरण रावच्या 'लापता लेडीज' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड
Laapataa Ladies:किरण रावच्या 'लापता लेडीज' चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

Laapataa Ladies : किरण राव (Kiran rao) दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) हा बहुचर्चित चित्रपट आहे.आता या सिनेमाची ऑस्कर पुरस्कारांसाठी (Oscars Nomination) निवड करण्यात आली आहे. किरण रावचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. तिच्या या पहिल्याच सिनेमाची दखल ऑस्करनेही घेतली आहे. या सिनेमाची कथा ही प्रत्येकालाच भावली. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या कथेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही चांगल यश या सिनेमाने मिळवलं.

नक्की वाचा : पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका!नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

‘लापता लेडीज’ची ऑस्कर झेप (Laapataa Ladies)

हलक्या फुलक्या कॉमेडीच्या लापता लेडीजने तब्बल २९ चित्रपटाला मागे टाकले. यामध्ये रणवीरचा अॅनिमल, मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘आट्टम’ आणि कान्स विजेता ‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ यांचा समावेश आहे. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलुगू चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘हनु-मान’ यांनाही मागे टाकले आहे. २९ चित्रपटांच्या यादीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘आर्टिकल ३७०’ देखील समाविष्ट होते.

अवश्य वाचा : ‘मी ओरिजनल मराठ्यांच्या अवलादीचा,मी भिडा म्हटले तर चटणीला पुरणार नाहीत’-मनोज जरांगे
दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यीय निवड समितीने एकमताने आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निवड केली. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत या चित्रपटाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लापता लेडीज चित्रपटात उत्तर प्रदेशातील साध्या घरातील स्त्रियांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष या सिनेमाच्या गोष्टीने वेधून घेतलं आहे. गेल्यावर्षी ऑस्करसाठी मल्याळम सुपरहिट ‘२०१८: एवरीवन इज ए हीरो’ चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठण्यात आले होते. पण त्या चित्रपटाला कोणताही पुरस्कार मिळाला नव्हता.

किरण रावची प्रतिक्रिया ? (Laapataa Ladies)

ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सिनेमाची दिग्दर्शिका किरण राव हिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. किरण रावने तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘लापता लेडीज हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गोष्टीचा खूप आनंद झालाय. ही माझ्या संपूर्ण टीमच्या कष्टाची घेतलेली दखल आहे. सिनेमा हे मनं जोडण्यासाठी, सीमा ओलांडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणांसाठी कायमच एक प्रभावी माध्यम राहिलं आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल’,असं तिने सांगितले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here