Kishor Darade Vs Vivek Kolhe | शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे आज भरणार उमेदवारी अर्ज; आमदार किशोर दराडेंच्या चिंतेत वाढ

Kishor Darade Vs Vivek Kolhe | नगर : गणेश कारखाना निवडणुकीमुळे राज्यात चर्चेत आलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.

0
Kishor Darade Vs Vivek Kolhe
Kishor Darade Vs Vivek Kolhe

Kishor Darade Vs Vivek Kolhe | नगर : गणेश कारखाना निवडणुकीमुळे राज्यात चर्चेत आलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. ते आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे.  नाशिक येथे दुपारी १ वाजे नंतर ते आपला अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या चिंता वाढल्या आहेत. महायुती या मतदारसंघातून कोणाला तिकीट हे लवकरच कळणार आहे. 

हे देखील वाचा: शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी; महसूलमंत्र्यांची मागणी

विखे-कोल्हे संघर्षाची किनार (Kishor Darade Vs Vivek Kolhe)

युवानेते विवेक कोल्हे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा अथवा राहता विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करतील अशी चर्चा होती. मात्र, विवेक कोल्हे यांनी अचानकपणे नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्याचा निर्णय घेत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. त्याच ते आज अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याने राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत.
नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ३१ मेपासून त्याची नोटिफिकेशन जारी होणार आहे. अर्ज भरण्याची ७ जून ही शेवटची तारीख आहे. तर अर्ज माघार घेण्याची तारीख १२ जूनला आहे. २६ जूनला मतदान होणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या सह  युवानेते विवेक कोल्हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ राजेंद्र विखे-पाटील यांनी जोरदार  तयारी सुरू केल्याने उन्हाळ्यातील तापमानाबरोबरच  शिक्षक मतदारसंघाचे राजकारण तापणार आहे. सध्या दिग्गज उमेदवार रिंगणात उतरत असल्याने या निवडणुकीचे सूत्रे थेट मुंबईतून हालतील असे बोलले जात आहे.

नक्की वाचा : मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून

आशुतोष काळेंविरोधात कोण उमेदवारी करणार? (Kishor Darade Vs Vivek Kolhe)

युवानेते विवेक कोल्हे व राजेंद्र विखे दोघे उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसातच भाजपकडून कोण उमेदवारी करेल हे चित्र स्पष्ट होईल. मात्र, आज विवेक कोल्हे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची वाट न पाहता थेट पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेऊन राज्याच्या राजकारनात एकच खळबळ उडवून दिली आहे.

विवेक कोल्हे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करतील असे जवळपास निश्चित झाले असताना त्यांनी  नाशिक शिक्षक मतदारसंघातून अचानकपणे उमेदवारी करण्याचे जाहीर केल्याने अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे. जर विवेक कोल्हे हे नाशिक मतदारसंघातून उमेदवारी करणार असतील तर मग येणाऱ्या विधानसभा निवडणूकित कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात कोण उमेदवारी करणार हा प्रश्न या निमित्ताने  उपस्थित झाला आहे.  पुन्हा माजी आमदार स्नेहलता कोल्हेच उमेदवारी करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. विखे यांच्यामुळे जर विवेक कोल्हे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर न झाल्यास ते अपक्षच निवडणूक लढवणार का ? की इतर पक्षाचा पाठिंबा घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच कोल्हेची पुढची दिशा काय असणार ? या सारखे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे काही दिवसात मिळतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here