Kishor Darade Vs Vivek Kolhe | ही निवडणूक साखर कारखान्याची नाही; किशोर दराडेंची विवेक कोल्हेंवर टीका

Kishor Darade Vs Vivek Kolhe | ही निवडणूक साखर कारखान्याची नाही; किशोर दराडेंची विवेक कोल्हेंवर टीका

0
Kishor Darade Vs Vivek Kolhe | ही निवडणूक साखर कारखान्याची नाही; किशोर दराडेंची विवेक कोल्हेंवर टीका
Kishor Darade Vs Vivek Kolhe | ही निवडणूक साखर कारखान्याची नाही; किशोर दराडेंची विवेक कोल्हेंवर टीका

Kishor Darade Vs Vivek Kolhe | नगर : ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teacher Constituency Election) आहे, साखर कारखान्याची नाही. डमी उमेदवार देऊन दिशाभूल करण्याइतपत शिक्षक अज्ञानी नाही. नाशिक शिक्षक मतदारसंघात काम मोठ्या प्रमाणात केल्याने, विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यासाठी ते शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shivsena) नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Kishor Darade Vs Vivek Kolhe) यांच्यावर केला आहे.

अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

पत्रकार परिषदेत विरोधकांचे आरोप खोटे असल्याचा खुलासा

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली असताना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरात रविवारी (ता. १६) पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचा खुलासा केला. या पत्रकार परिषद प्रसंगी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले, सचिव संभाजी पवार, नगर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिथुन डोंगरे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू

आमदार दराडे म्हणाले की (Kishor Darade Vs Vivek Kolhe)

शिक्षकांचे सर्वाधिक प्रश्न सोडविण्याचे काम केले. मागील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रान्वये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर डमी उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केले गेले नाही. सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नसल्याने साखर सम्राटांमध्ये भीती निर्माण झाली असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला आमदार किशोर दराडे यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना लगावला.

ते पुढे म्हणाले की, डमी उमेदवार कोपरगावचा आहे. विरोधकांनी त्याला १५ लाख रुपये व नोकरीचे अमिष दाखवून उमेदवारीचा अर्ज भरण्यास लावला. ते जवळच्या नात्यात असल्याने त्यांचे अपहरण केलेले नाही. पोलिसांनी त्या व्यक्तीला घरी सोडले. त्याची याबाबत कोणतीही तक्रार नाही. आरोप करणाऱ्या साखर सम्राटांनी येवलेला साखर कारखाना होऊ दिला नाही. कोपरगावपासून १८ किलोमीटरवर असलेल्या येवला येथे कारखाना झाला असता, तर त्यांचा कारखाना बंद पडला असता. येवलेकरांना त्यांनी नेहमाच त्रास देण्याचे काम केले. आरोप करणाऱ्यांनी सरकारकडून ११७ एकर जमीन स्वतःच्या नावावर करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिक्षकांच्या प्रश्‍नावर दराडे यांनी सर्वाधिक प्रश्‍न मांडले व अनेक प्रश्‍न सोडवली. १९ वर्षांपासून प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजनेचा प्रश्‍नावर आवाज उठविल्याने तो प्रश्‍न पटलावरती आला व ते सोडविण्याचे काम सुरू आहे. २००५ नंतरच्या शिक्षकांसाठी सकारात्मक निर्णय होणार आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले, शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक दरबार ही नवीन संकल्पना मांडली व शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम केले. कामाच्या जीवावर शिक्षकांकडे मते मागत असल्याचे त्यांनी जाहीर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here