KKR vs DC : सॉल्टची अर्धशतकी खेळी;कोलकात्याचा दणदणीत विजय 

दिल्ली कॅपिटल्सच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहज विजय मिळवला.

0
KKR vs DC
KKR vs DC

नगर : आयपीएल २०२४ मधील ४७ वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders)दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) ७ विकेट्सनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ९ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात कोलकाताने फिलीप सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६.३ षटकांत ३ गडी गमावून १५७ धावा करत एकतर्फी विजय मिळवला.

नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार   

फिलीप सॉल्टची स्फोटक कामगिरी (KKR vs DC )

दिल्ली कॅपिटल्सच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहज विजय मिळवला. कोलकाता संघासाठी फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेनने पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. फिलीप सॉल्टने स्फोटक कामगिरी केली. सॉल्टने ३३ चेंडूंचा सामना करत ६८ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ३३ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने नाबाद २६ धावा केल्या. दिल्लीसाठी अक्षर पटेलने गोलंदाजीत कमाल केली. त्याने २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर विल्यम्सने १ विकेट घेतली.

अवश्य वाचा : यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर  

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीसाठी संघर्ष (KKR vs DC )

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स ची फलंदाजी या सामन्यात संघर्ष करताना दिसली. पॉवर प्ले मध्ये संघाने तीन गडी गमावले. शॉने १३ धावा केल्यानंतर, मॅकगर्क १२ धावा करून आणि होप सहा धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात दिल्ली ने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला बाद केले. त्याला १५ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये २५ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी जी वरुण चक्रवर्तीने संपुष्टात आणली.

वरुण चक्रवर्तीने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो २० चेंडूत २७ धावा करून परतला. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अवघ्या चार धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने १५ धावा, कुमार कुशाग्रने एक धाव, रसिक सलामने आठ धावा, कुलदीप यादवने ३५ धावा आणि लिझादने एक धाव केली. कुलदीप आणि लिझाड नाबाद राहिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने तीन तर वैभव आणि हर्षीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here