Knife Attack : प्रेयसीवर चाकू हल्ला; प्रेयकरावर गुन्हा दाखल

Knife Attack : प्रेयसीवर चाकू हल्ला; प्रेयकरावर गुन्हा दाखल

0
Knife Attack : प्रेयसीवर चाकू हल्ला; प्रेयकरावर गुन्हा दाखल
Knife Attack : प्रेयसीवर चाकू हल्ला; प्रेयकरावर गुन्हा दाखल

Knife Attack : नगर : किरकोळ भांडणाच्या कारणावरून प्रियकरानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार (Knife Attack) करून तीला ठार मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder) केला आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) नवनागापूर येथील आनंदनगर परिसरात घडली. याबाबत फिर्यादीच्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा :  आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…   

घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद

फिर्यादी ही आकाश रघुनाथ शेरकर (रा. सप्रे मळा, सह्याद्री चौक, एमआयडीसी) याच्या सोबत गेल्या सात महिन्यांपासून आनंदनगर, नवनागापूर येथे भाड्याच्या घरात राहत आहे. हे दोघे प्रेमसंबंधात असून लवकरच विवाह करण्याचे ठरवत होते. मात्र, घरगुती कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

अवश्य वाचा :  “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य 

उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल (Crime)

फिर्यादी ही सकाळी ११ वाजता आपल्या आईला फोन करून सांगितले की, आकाशसोबत किरकोळ वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात चाकूने गळ्यावर वार करून तो घरातून निघून गेला आहे. दरम्यान, या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.