Knife Attack : नगर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणाला चाकूने वार (Knife Attack) करून जखमी करण्यात आले आहे. अंकुश हेमंत काळे (वय २५, रा. बहिरवाडी, ता. अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीतील जेऊर गावाजवळील टोलनाक्यावर शनिवारी (ता. १५) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
चाकूने पोटावर आणि छातीवर वार (Knife Attack)
जखमी अंकुश काळे यांनी फिर्याद दिली आहे. भूषण ऊर्फ अमोल पटारे, प्रमोद मापारी, पोपट पटारे (सर्व रा. राळेगणसिद्धी, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत. घटनेच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास अंकुश हे आपल्या मित्रासोबत डंपरमध्ये डिझेल भरण्यासाठी जेऊर येथील पेट्रोलपंपावर गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांना शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला. अंकुश यांनी त्यांचा पाठलाग केला आणि बंद असलेल्या टोलनाक्याजवळ त्यांना पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत अमोल पटारे याने आपल्याकडील चाकूने अंकुश यांच्या पोटावर आणि छातीवर वार करून त्यांना जखमी केले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सुशांत दिवटे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



