Knife Attack : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी परिसरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून तरूणावर चाकूने हल्ला (Knife Attack) केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एका तरुणासह त्याच्या मित्राला मारहाण (Beating) करून दोन दुचाकींची तोडफोड केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद
या हल्ल्यात विकास मारूती शेंडगे (वय २५, रा. अहिल्यानगर- जामखेड रस्ता, निंबोडी, ता. अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली होती. निलेश पोटे, गोट्या मोरे (पूर्ण नावे माहिती नाही), अक्षय कचरू माळी (सर्व रा. निंबोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून वाद (Knife Attack)
निंबोडी येथील एका दुध डेअरीसमोर फिर्यादी तरूण आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते. यावेळी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि निलेश पोटे याने फिर्यादीच्या पाठीत चाकू खुपसून जखमी केले. संशयित आरोपींनी दगडाने दोन दुचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हल्ल्यात फिर्यादीचा मित्र जखमी झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.



