
Knife attack : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील चास शिवारातील आडसुळ कॉलेजच्या (Adsul College) बाहेर विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला (Knife attack) झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) गुन्हा दाखल (Case registered) झाला आहे.प्रशांत दत्तात्रय जाधव (वय १९, रा. सारंगवस्ती, निमगाव वाघा, ता. अहिल्यानगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. जखमी प्रशांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. साहिल शेवाळे (रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) व त्याच्या सोबतच्या अनोळखी दोन मित्रांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा: टोळक्याकडून ठेकेदाराला बेदम मारहाण; आठ जणांविरूध्द भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाद टाळण्याचा प्रयत्न
प्रशांत जाधव हा आपल्या मित्रासोबत महाविद्यालयाच्या पटांगणात बोलत जात होता. त्यावेळी संशयित आरोपी साहिल शेवाळे याने तिथे येत तू मला शिवी का दिली, असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. फिर्यादीने वाद टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्याला हॉटेलवर येण्याची धमकी दिली. यानंतर प्रशांत हा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये डबा आणण्यासाठी गेला असता, साहिल शेवाळे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र तिथे आले. तुला भांडण करायचे आहे का? असे विचारत त्यांनी वाद उकरून काढला.
अवश्य वाचा: ई-पीक पाहणीसाठी प्रशासन ‘मिशन मोड’वर!; अधिकाऱ्यांची थेट बांधावर धाव
चाकू काढून वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण (Knife attack)
यावेळी साहिलच्या एका साथीदाराने कमरेला लावलेला चाकू काढून प्रशांतवर वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी प्रशांत जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


