Knife Attack : नगर : अहिल्यानगर शहरातील कल्याण रस्त्यावर किरकोळ वादातून दोघा मित्रांवर चाकूने हल्ला (Knife Attack) करून जखमी (Injuries) केल्याची घटना समोर आली आहे. गणेश किरण बोरूडे (वय २३, रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रस्ता) व इंद्रजित राहिंज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी गणेश बोरूडे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या त्या पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
सनी राजेंद्र जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद व प्रणव दाणे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बोरूडे आणि त्यांचा मित्र इंद्रजित राहिंज हे दुचाकीवरून जात असताना घोडा टांगा पुढे घेण्याच्या कारणावरून सनी जाधव याच्याशी त्यांचा वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून, गणेश व्दारका लॉन्स परिसरात आले असता सनी जाधव, प्रथमेश पठारे, समीर सय्यद आणि प्रणव दाणे यांनी त्यांना गाठले. तू खूप माजला आहेस का, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली.
हे देखील वाचा: अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं
पाठीवर व चेहऱ्यावर चाकूने वार (Knife Attack)
हल्ल्यादरम्यान गणेश जीव वाचवण्यासाठी पळत असताना समीर सय्यद याने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी इंद्रजित राहिंज मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, प्रणव दाणे याने त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले, केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.



