Kolhapur Crime: बापरे!कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या

0
Kolhapur Crime : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
Kolhapur Crime : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या

Kolhapur Crime : पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची विजेचा शॉक देऊन हत्या (Murder By shock) करण्यात आली आहे. फैजान नाजिमा (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : ‘त्या’ सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापुरात नेमकं काय घडलं ? (Kolhapur Crime)

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत एकूण ८० विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश ७० विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली. फैजानचा मृतदेह सापडल्यानंतर झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

अवश्य वाचा : निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन

घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय  (Kolhapur Crime)


अल्पवयीन मुलं घर सोडून शेकडो किमी परराज्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येतात, तिथे धार्मिक शिक्षण घेतात. या सर्व प्रकाराला कंटाळून, घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे.