Kopargaon : कोपरगाव शहरात सशस्त्र पथसंचलन

Kopargaon : कोपरगाव शहरात सशस्त्र पथसंचलन

0
Kopargaon : कोपरगाव शहरात सशस्त्र पथसंचलन
Kopargaon : कोपरगाव शहरात सशस्त्र पथसंचलन

Kopargaon : कोपरगाव : शहर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान, शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने कोपरगाव (Kopargaon) शहरात सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. शहरात मोठा पोलीस (Police) फौजफाटा पाहून नागरिकांना धडकी भरल्याचे चित्र पहावयास मिळाले. गणेशोत्सव, ईद ए मिलाद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने शहरातील संवेदनशील परिसर मुख्य रस्त्यावरून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले आहे. सदर पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

नक्की वाचा: डीजे मुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होतेय : आमदार तांबे

पथसंचलनात सहभाग

सदर पथसंचलनात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डेपोटी कमांडंट अलोक कुमार झा, सहायक डेपोटी कमांडंट विशाल एरंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पखाले यांच्यासहित 130 जवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, भूषण हंडोरे, पोलीस कर्मचारी अंमलदार होमगार्ड आदींनी सहभाग घेतला होता.

अवश्य वाचा: पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा; आयुक्तांचे आवाहन

मुख्य रस्त्यावरून पंथसंचलन (Kopargaon)

कोपरगाव शहर पोलीस ठाणे, गांधीनगर, दत्तनगर, श्री राममंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, धारणगावरोड, आयशा कॉलनी, खंदकनाला परिसर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मुख्य रस्त्यावरून हे पंथसंचलन करण्यात येऊन त्याचा समारोप शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला.