Kopargaon : नगर : कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादाचा तहसीलदार (Tehsildar) महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. वादी-प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढल्याने समाधान व्यक्त करत प्रशासनाचे (Administration) आभार मानले.
नक्की वाचा : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी;’या’ दिवसापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची काउंटर विक्री बंद
प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन सामंजस्य घडवून आणले
सांगवी भुसार येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरही वाद मिटला नव्हता. न्यायालयीन लढाई, वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता. अखेर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोन्ही पक्षांना एकत्र बसवले आणि संवादातून सामंजस्य घडवून आणले. दोघांनीही मोठेपणा दाखवत शेत रस्ता खुला करण्यास सहमती दर्शवली. उपस्थित पंचमंडळींनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.
मायगाव देवी येथे हा वाद जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या शेतीशी संबंधित होता. वादाच्या सुरुवातीला तणाव निर्माण झाला होता, मात्र तहसीलदारांच्या संयमी आणि संवेदनशील हस्तक्षेपाने दोन्ही पक्ष सहमत झाले.
अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
वादी-प्रतिवादींनी मिठी मारून व्यक्त केले समाधान (Kopargaon)
न्यायालयाच्या दारात गेल्याशिवाय वाद मिटवता येतो, हे लक्षात घेत त्यांनी शेतरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. शेवटी, वादी-प्रतिवादींनी एकमेकांना मिठी मारून समाधान व्यक्त केले.