Koregaon Bhima Shaurya Divas:कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;वाहतूक मार्गात बदल

0
Koregaon Bhima Shaurya Divas:कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;वाहतूक मार्गात बदल
Koregaon Bhima Shaurya Divas:कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;वाहतूक मार्गात बदल

नगर : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे एक जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनानिमित्त पुणे पोलिसांकडून (Pune Police) मोठी तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी एक जानेवारीला राज्यातील अनेक बांधव तुळापूर येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत असतात. यंदाही कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सभेचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी वाहतुकीच्या मार्गात अनेक बदल (Change In Tranporatation Route) करण्यात आले आहेत. याठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही,याची काळजी घेण्यात आली आहे.

नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री  

यावर्षी कोरेगाव भीमा सभेसाठी ५ हजार पोलीस कर्मचारी,सातशे पन्नास पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत. यासोबतच १ हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करणार आहेत. त्याशिवाय, येथील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी ५० पोलिस टॉवर, १० ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक असेल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.यावेळी शांतता राखण्यासाठी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये, यासाठी सोशल मिडीयावर निर्बंध असणार असतील. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

अवश्य वाचा : आनंदवार्ता! भारताच्या कोनेरू हम्पीने मिळविले जागतिक रॅपिड बुद्धिबळचे विजेतेपद!

पार्किंगची सोय कशी असणार ? (Koregaon Bhima Shaurya Divas)

कोणालाही अडचण होणार नाही,यासाठी वाहतुकीची सोय-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात ४५ पार्किंग सेंटर आहेत. ३० हजार चारचाकी आणि ३० दुचाकी क्षमता असलेले सेंटर आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरेगाव येथे शौर्यदिनाच्या सभेनिमित्त वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. तरी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

वाहतुकीचे बदललेले मार्ग (Koregaon Bhima Shaurya Divas)

  • नगर रस्त्यावरील वाहतूक बदल एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार
  • पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुरमार्गे नगर रस्त्याने जावे लागेल.
  • सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे.
  • मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे.
  • मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या  लहान वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.
  • कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव, चौफुलामार्गे शिरूरकडे जावे.
  • इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुयायींच्या लहान वाहनांनाच  प्रवेशासाठी परवानगी  देण्यात येईल.
  • विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here