Kothla Stone Throwing Case :कोठला दगडफेक प्रकरण; ३० संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Kothla Stone Throwing Case

0
Kothla Stone Throwing Case :कोठला दगडफेक प्रकरण; ३० संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Kothla Stone Throwing Case :कोठला दगडफेक प्रकरण; ३० संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Kothla Stone Throwing Case : नगर : धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी (Kothla Stone Throwing Case) दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या ३० जणांना न्यायालयाने शुक्रवारी (ता. ३) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

अवश्य वाचा: ११ बालकांच्या मृत्यूमुळे कफ सिरपच्या वापराबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ॲडव्हायजरी केली जारी

रांगोळी वरून मुस्लिम समाज आक्रमक

अहिल्यानगर शहरातील बारातोंटी कारंजा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी काढलेल्या रांगोळी वरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकारामुळे मुस्लिम समाज आक्रमक होत सोमवारी (ता. २९ सप्टेंबर) सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला व नंतर अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कोठला परिसरात रास्तारोको केला. मात्र, रस्तारोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमाव एकाऐकीच आक्रमक झाला व त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये वाहनांचे नुकसान होऊन पोलीस जखमी झाले होते.

नक्की वाचा : निलेश घायवळचा आणखी एक प्रताप समोर; दोन जिल्ह्यात काढली ओळखपत्र

सुमारे १५० ते २०० जणांविरूध्द गुन्हा नोंद (Kothla Stone Throwing Case)

यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे १५० ते २०० जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे ४७ संशयितांचे नावे निष्पन्न केली असून त्यातील ३० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या ३० जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. ३) संपल्याने तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी अटकेतील ३० जणांना शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांना येथील कारागृहात न ठेवता नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.