Kotwali Police Station : नगर : सुगंधीत तंबाखू व गुटख्याची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीस (Accused) मार्केटयार्ड परिसरातून कोतवाली पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : किरण काळे प्रकरणाचा सखोल तपास व्हावा; खासदार नीलेश लंके यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव
शरद अर्जुन पवार (वय ३०, रा. जांब-कौडगाव, ता. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार आनंदधाम, मार्केट यार्ड परिसरात सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली
३ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Kotwali Police Station)
त्याच्याकडून ३ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शीतल मुगडे, गणेश देशमुख, गुन्हे शोध पथकाचे कृष्णकुमार सेदवाड, बाळकृष्ण दौंडे, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सूर्यकांत डोके, राहुल शिंदे, अभय कदम, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, संदीप कव्हळे, प्रतिभा नागरे, हिना बागवान, राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.