Kotwali Police Station : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चौघे ताब्यात; कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kotwali Police Station

0
Kotwali Police Station : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चौघे ताब्यात; कोतवाली पोलिसांची कामगिरी
Kotwali Police Station : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे चौघे ताब्यात; कोतवाली पोलिसांची कामगिरी

Kotwali Police Station : नगर : गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून तब्बल ४ लाख ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या बंगाली कारागीरासह चौघा संशयित आरोपींना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) पश्चिम बंगालमधून (West Bengal) ताब्यात घेतले आहे. पोलीस कोठडी (Police Custody) रिमांड दरम्यान गुन्ह्यातील ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने, हस्तगत करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…

पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांचे सहकार्य

फिर्यादी रमजान सलाम पियादा (रा. धरती चौक, अहिल्यानगर) हे बाहेर गेले असता त्यांच्या दुकानातील बंगाली कारागीर अरमान अली कुरबानअली शेख (रा. हुगली, पश्चिम बंगाल) याने संधी साधून ९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले. अरमान अली शेख याने आपले साथीदार नझरूल नुर हुसैन, आसिफ खलील शेख आणि सराफ व्यवसायिक अब्दुलनसीम शेख यांच्याकडे काही दागिने विक्री केल्याची खात्रीशीर माहीत मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने तपास पथक पश्चिम बंगालमधील हुगली व बर्धमान जिल्ह्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

यांच्या पथकाने केली कारवाई (Kotwali Police Station)

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक थोरात, सहाय्यक निरीक्षक गणेश देशमुख, तसेच पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, सलीम शेख, विशाल दळवी, सूर्यकांत डाके, विक्रम वाघमारे, संदीप पितळे, सत्यजित शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, महेश पवार, अतुल कोतकर, शिरीष तरटे, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.