Kotwali Police Station : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kotwali Police Station : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Kotwali Police Station : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kotwali Police Station : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kotwali Police Station : नगर : गृहकर्ज (Home Loan) प्रकरण मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एका एजंटने नगरमधील प्राध्यापकाची २ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) चेतन दत्तात्रय दांडेकर (रा. पुणे) या एजंट विरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

गृह कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे आमिष

याबाबत प्रा. सुधीर रामचंद्र बळे (रा. सुप्रिया अपार्टमेंट, पुनममोतीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना पुणे येथे फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीच्या बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यांच्यातील चर्चेत चेतन दांडेकर हा एलआयसीमधून गृह कर्ज प्रकरण मंजूर करून देत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ७ जून २०२३ रोजी फिर्यादी बळे यांनी चेतन दांडेकरशी संपर्क करून गृहकर्जाची चौकशी केली. त्याने सांगितल्या प्रमाणे बळे यांनी त्यास सर्व कागदपत्रे, बँक ऑफ महाराष्ट्र च्या खात्याचे ४ कोरे चेक व फाईल तयार करण्याचा खर्च म्हणून ५० हजार रुपये दिले. त्यानंतर चेतन दांडेकर यास वारंवार संपर्क केल्यावर त्याने २ दिवसांत होईल, ८ दिवसांत होईल असे सांगत चालढकल केली.

अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी

२ लाख ५० हजारांची फसवणूक (Kotwali Police Station)

फिर्यादी यांनी चेतन दांडेकर यास सांगितलेले काम रद्द करत बजाज फायनान्समध्ये गृहकर्ज प्रकरण केले. त्यानंतर दांडेकर यास कर्ज प्रकरणासाठी दिलेले कागद पत्रे, कोरे चेक व ५० हजारांची मागणी केली असता त्याने टोलवाटोलवी केली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादी यांना बँकेचा मेसेज आला व त्यात त्यांच्या बँक खात्यातून २ लाख रुपये डेबिट झाल्याचे समजले. फिर्यादी यांनी तातडीने बँकेत जावून चौकशी केली असता त्यांनी चेतन दांडेकर यास दिलेल्या कोऱ्या चेक पैकी १ चेक द्वारे त्याने २ लाख रुपये डी. सी. बी. बँक चिंचवड शाखा येथून काढून घेतल्याचे त्यांना समजले. नंतर वारंवार चेतन दांडेकर यास फोन केले असता त्याचा फोन बंद लागला व त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. चेतन दांडेकर याने आपण पूर्वी दिलेले ५० हजार आणि बँक खात्यातून चेकद्वारे २ लाख रुपये काढून घेत अशी एकूण २ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.