
Kotwali Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौक (Mahatma Phule Chowk), मार्केट यार्ड (Market Yard) परिसरात गैरकायद्याचे मंडळी जमून सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
पोलीस निरीक्षक गायकवाड यांना फोनद्वारे माहिती
कुणाल दगडू हरवा, भारती अशोक बारसे, अमोल रघुनाथ हरबा (सर्व रा. सारसनगर), सार्थक अशोक बारसे, प्रकाश बाबुराव भागानगरे, शिवतेज प्रकाश भागानगरे (रा. सारसनगर ), व इतर आठ ते दहा अनोळखी व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार अतुल केशव काजळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना काही व्यक्ती मोठमोठ्याने शिवीगाळ करत रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्यांची तोडफोड करत असल्याची माहिती फोनद्वारे मिळाली.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
टपऱ्यांची तोडफोड (Kotwali Police Station)
रात्रीची गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाला घटनेची माहिती देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी टपरी लावायची नाही, असे म्हणत शिवतेज भागानगरे, प्रकाश भागानगरे यांनी टपऱ्यांची तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


