
Kotwali Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरात दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेट व पैशाचे आमिष दाखवत जवळ बोलावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
चॉकलेट व पैशाचे आमिष
अमित सुभाष गवळी (वय २२, रा. विजयनगर, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी नाव आहे. सोमवारी (ता. ३०) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस मागे, आनंदीबाजार येथे हा प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणीला हातवारे करून जवळ बोलावले व चॉकलेट तसेच पैशाचे आमिष दाखविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पुढील कार्यवाही सुरू (Kotwali Police Station)
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करीत असून, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.


