
Kotwali Police Station : नगर : अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरातील शाळेच्या पडवीमध्ये सुरू असलेल्या जुगार (Gambling) अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी (Police) रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण चार हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ
तिरट नावाचा जुगार खेळताना आढळले
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, गांधी मैदान येथील एका शाळेच्या पडवीत काही व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकण्याचे नियोजन केले. पोलीस पथकाने रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी काही जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना जागीच पकडून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जुगारासाठी वापरलेले पत्ते व रोख रक्कम जप्त (Kotwali Police Station)
या कारवाईत संदीप भिमराव काळे (वय ४४), संजय कृष्णहरी नुती (वय ३२), देवीदास बलराज शिरापुरम (वय ३९), अमित अर्जुन गाली (वय ३६) आणि सुनील दत्तात्रय शिंदे (वय ४६) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते तसेच रोख रक्कम मिळून आली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


