Kriti And Pulkit Wedding: अभिनेत्री क्रिती खरबंदा व पुलकित सम्राट अडकले लग्न बंधनात

0

नगर : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा पार पडला. रकुलनंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकीत सम्राटने लग्नगाठ (Wedding) बांधली आहे. दोघांनी १६ मार्च रोजी दिल्लीजवळील मानेसरमध्ये एकमेकांसोबत सप्तपदी घेतली. या दोघांचा लग्नसोहळा अगदी थाटात पार पडला आहे. नुकतेच क्रिती आणि पुलकितने लग्नसोहळ्याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

नक्की वाचा : लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; आदर्श आचारसंहिता लागू, किती टप्यात निवडणुका जाणून घ्या…

क्रिती आणि पुलकितचा वेडिंग लूक (Kriti And Pulkit Wedding)

क्रिती आणि पुलकितने लग्नामध्ये एकदम खास लूक केला आहे. लग्नामध्ये क्रितीने पिंक कलरचा लेहेंगा आणि डायमंड ज्वेलरी असा लूक केला होता. तर पुलकितने लग्नामध्ये सी ग्रीन कलरची शेरवानी आणि फेटा परिधान केला होता. सध्या चाहत्यांमध्ये, पुलकित च्या शेरवानीवरील डिझाईनची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने लग्नातले खास क्षणांचे फोटो शेअर करताच ते इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहेत.क्रिती आणि पुलकितने लग्नाचे फोटो शेअर करताना याला खास कॅप्शन दिले आहे. 

अवश्य वाचा : आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे देशवासियांना खुलं पत्र

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राटने घेतली सप्तपदी  (Kriti And Pulkit Wedding)

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. दोघेही गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन घेतले आहे. पुलकितचे हे दुसरं लग्न आहे. त्याने आधी २०१४ मध्ये, श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. पण पुलकित आणि श्वेता यांचा संसार जास्त दिवस काही टिकला नाही. पुलकित आणि श्वेता यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला. ३० जानेवारीला क्रिती आणि पुलकितचा रोका सेरेमनी पार पडला. त्याचे फोटो या दोघांनी  शेअर केले होते. यावेळी फक्त कुटुंब आणि काही मित्र उपस्थित होते. पुलकीतने ‘बिट्टू बॉस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ‘पागलपंती’ चित्रपटाच्या सेटवर पुलकित आणि क्रितीच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली. या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here