Kukadi : नगर : जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे (Shrigonda) आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कुकडीच्या (Kukadi) डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन आजपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून
पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय करण्याच्या सूचना
कुकडीच्या आवर्तनाबाबत यापूर्वीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आवर्तनाच्या आज झालेल्या निर्णयानुसार कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन गुरुवार (ता. ३०) पासून सुरू करण्यााचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हााची तीव्रता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करा, असे आवाहनही मंत्री विखे पाटील केले आहे.