Kukadi Water : श्रीगोंदा : डिंभा ते माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने मार्गी लावावे, साकळाई कामाला मंजुरी मिळावी, नामदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात या मागण्यांसाठी पुणे येथे सिंचन भवन (Sinchan Bhavan Pune) कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. नामदार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागातील कुकडी, घोड, मीना नदीवरील असलेल्या ६५ बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये (Kukadi Water) समाविष्ट करावा व त्यांच्या भागातल्या चार उपसा सिंचन योजनेला परवानगी द्यावी, असा घाट घातला आहे.
साकळाईला योजना देखील प्रलंबित
त्यांच्या मागण्या रद्द कराव्यात. कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेत पाणी द्यायचे असेल तर बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या मागणीचा विचार करून शासनाकडून या बोगद्याला मंजुरी देण्यात आली होती. परंतू अद्याप काम सुरू नाही. तसेच नगर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावे म्हणून साकळाईला तत्वता मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती, परंतु ही योजना देखील प्रलंबित आहे. हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता.
नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार
कुकडी प्रकल्पाचे भविष्य धोक्यात (Kukadi Water)
दिवसेंदिवस कुकडी प्रश्न गंभीर होत चालला आहे. कुकडी प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आहे. नामदार वळसे पाटील यांच्या मागण्या जर मान्य केल्या तर कुकडी कॅनॉल चा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होईल, असे शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी बोलताना सांगितले. प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता सांगळे यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून लवकरच मार्ग काढणार असल्याचे सांगत आश्र्वासित केले. यावेळी संतोष लगड, माऊली मोटे, भूषण बडवे, भाऊसाहेब मांडे, रघुनाथ सुर्यवंशी यांची भाषणे झाली. महादेव म्हस्के, बाळासाहेब लोंढे, राजेंद्र ईधाटे, जालिंदर बोडखे, बाळसाहेब शिंदे, शशिकांत जगताप आदी शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.