Kumarsinh Wakale : पुन्हा सर्वेक्षण करून वाढीव घरपट्टी कमी करा; माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांची मागणी 

Kumarsinh Wakale : पुन्हा सर्वेक्षण करून वाढीव घरपट्टी कमी करा; माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांची मागणी 

0
Kumarsinh Wakale : पुन्हा सर्वेक्षण करून वाढीव घरपट्टी कमी करा; माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांची मागणी 
Kumarsinh Wakale : पुन्हा सर्वेक्षण करून वाढीव घरपट्टी कमी करा; माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांची मागणी 

Kumarsinh Wakale : नगर : महापालिकेच्या (AMC) वतीने घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे कुठलीही शहानिशा न करता नागरिकांना वाढीव दराची घरपट्टी आकारण्यात आली आहे. ५० हजारांपासून थेट दीड लाखापर्यंतची पावती देण्यात आली आहे. नागापूर, बोल्हेगाव, गांधीनगर परिसरामधील नागरिक औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत आहेत. ज्या घरांमध्ये भाडेकरू नाही अशांना देखील वाढीव घरपट्टी दिली आहे. तरी महापालिका प्रशासनाने पुन्हा घराचे सर्वेक्षण करून योग्य ती घरपट्टी द्यावी, अन्यथा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे (Kumarsinh Wakale) यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. यावेळी महापालिकेचे प्र. उपायुक्त मेहेर लहारे यांना निवेदन देण्यात आले.

अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक

यावेळी उपस्थिती

यावेळी सुरेश अडसुळे, अशोक गाडे, विजय भोसले, सुनील भालेराव, संकेत भिंगारदिवे, साधना बोरुडे, वैशाली राजहंस, माधुरी गायके, अशोक पोकळे, मोहन गाडे, कविता वाळुंजकर, संतोष म्हस्के, अनिल शिंदे, अशोक रोडे, लियाकत सय्यद, शुभम काकडे, बाळासाहेब आघाव, अनिता भोसले, राहुल कातोरे, महादेव पवार, गणेश कोकाटे, भाऊसाहेब इथापे, रामदास फंड, साईनाथ आवारे, संजय पाटील, अर्जुन खिळे, राहुल तोडमल आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार

करवाढीमुळे नागरीकांमध्ये असंतोष (Kumarsinh Wakale)

बोल्हेगाव नागापूर भागात आपल्या मार्फत एका कंपनीच्या खासगी कर्मचाऱ्यानी रीव्हीजन (फेरसर्वेक्षण) केले आहे. हे सर्वेक्षण करताना सर्वच पक्के घरे, गाळे, पत्र्यांचे शेड, इ मोजमाफ करून त्यावर जास्त भाडे आकारले आहे. या करवाढीमुळे नागरीकांमध्ये असंतोष पसरलेला असुन याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने घरपट्टीचे बिले कमी करून ते नियमित प्रमाणे बिले वाटप करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.