Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा : डॉ.पंकज आशिया

Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा : डॉ.पंकज आशिया

0

Kumbh Mela : नगर : नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक भेट देण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे आणि पर्यटकांसाठी (Tourist) सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी केले.

अवश्य वाचा : श्रीरामपूर काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती कमळ; मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश

जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पूर्वतयारी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : काळभैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, (Kumbh Mela)

उत्तर प्रदेशात कुंभ निमित्ताने धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सोबत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेस्थानक, रस्ते, विमानतळ सुविधांच्या सुधारणेवर भर द्यावा.

पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. आरोग्य सुविधा, सुरक्षा विषयक उपाययोजना, स्वच्छतागृह, प्रमुख रस्ते, परिसर सुशोभीकरण, पोलीस मदत केंद्रे आदी व्यवस्थेचे आतापासूनच नियोजन करावे. शिर्डी आणि शनीशिंगणापूर परिसरातील रस्त्यांना लागून वाहनतळ तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागा निश्चित कराव्या. यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सादरणीकरणाद्वारे सिंहस्थाच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीची माहिती दिली.