नगर : प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामराने (Comedian Kunal Kamra) एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनगीताने (Satire) राज्याच्या राजकारणात एक नवा वाद सुरु झाला आहे. कुणाल कामराने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलं आणि शो केला त्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली. तसंच विधानसभेतही कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)केलेल्या टीकेचे प्रतिसाद उमटले. या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामराने चार पानी स्टेटमेंट (Four page statement) पोस्ट केलं आहे.
नक्की वाचा : कुणाल कामराच्या गाण्याच्या वादावरून देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
कुणाल कामराची पोस्ट काय? (Kunal Kamra)
माय स्टेटमेंट असं म्हणत त्याने चार पानी पोस्ट लिहिली आहे. पहिल्या पानावर कुणाल कामराने लिहिलं आहे की, “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटट हे ठिकाण, तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. लॉरी भरुन टॉमेटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.”असं कुणाल कामराने त्याच्या मिश्किल अंदाजात पहिल्या पानावर म्हटलं आहे.
अवश्य वाचा : नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या फहिम खानच्या घरावर बुलडोझर
कुणालने दुसऱ्या पानावर लिहिलं आहे की, मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी:अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे. त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही.राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही,असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.
प्रकरण नेमकं काय?(Kunal Kamra)
कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.