Kurla Bus Accident : अहिल्यानगर : कुर्ला येथे इलेक्ट्रिक बेस्ट बसने (Kurla Bus Accident) वाहनं आणि पादचाऱ्यांना चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे. भीषण अपघातात (Accident) मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. आरोपी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी (Police) अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलगा जखमी
तिघांचे घटनास्थळीच मृत्यू तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेनंतर आरोपीला स्थानिकांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या अपघातात जवळपास ४८ जण जखमी झाले असून ११ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. इतरांना राजावाडी, केईम, सायन, शताब्दी अशा विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी तिघांचे मृत्यू घटनास्थळीच झाले, तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चालकाकडे अनुभवाची कमतरता (Kurla Bus Accident)
पोलीसानी आरोपीचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. आरोपी संजय मोरेला ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का याची चौकशी करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करत आहेत. या अपघात प्रकरणात बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि सबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी आरोपी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नव्हता, असे समोर आले आहे.