Kurla To Vengurla Movie:’कुर्ला टू वेंगुर्ला’ मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’;’या’ दिवशी होणार प्रदर्शित

0
Kurla To Vengurla Movie:'कुर्ला टू वेंगुर्ला' मधून उलगडणार 'एका लग्नाची गोष्ट';'या' दिवशी होणार प्रदर्शित
Kurla To Vengurla Movie:'कुर्ला टू वेंगुर्ला' मधून उलगडणार 'एका लग्नाची गोष्ट';'या' दिवशी होणार प्रदर्शित

Kurla To Vengurla Movie : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षा देखील बदलल्या आहेत. अशाच ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ (Kurla To Vengurla Movie) या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले (Vaibhav Mangale) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

नक्की वाचा :  आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…   

चित्रपटाची कथा नेमकी काय ? (Kurla To Vengurla Movie)

काही वर्षांत गावातल्या मुलांची लग्न जमणे ही एक समस्याच झाली आहे. याच संकल्पनेचा वेध “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी असणारी कहाणीच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. या धमाल गोष्टीला मालवणी भाषेचा तडकाही आहे. प्रत्येकाचं मनोरंजन करणारी आणि प्रत्येक घराला रिलेट होणारी ही गोष्ट आहे. म्हणूनच नावापासून कुतुहल निर्माण करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता १९ सप्टेंबरपर्यंत वाट पहावीच लागेल यात शंका नाही.

अवश्य वाचा :  “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य 

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी  “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनवणे, अविनाश सोनवणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे.

चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार (Kurla To Vengurla Movie)

अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनवणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन, अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन व पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल इंटरटेनमेंट काम पाहणार आहे.