Jan Dhan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१४ मध्ये जनधन योजना (Jan Dhan Yojana) राबवली होती. या योजनेचा लाभ घेत अनेक लाभार्थ्यांनी बँकेमध्ये खाते उघडलेत. कोरोना काळात या जनधन खात्यावर काही विशिष्ट रक्कम देखील देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जनधन खाते सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केवायसी (KYC) करण्याचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे.
नक्की वाचा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी
केवायसी करण्याचा केंद्र सरकारचा आदेश (Jan Dhan Yojana)
जी खाती मागच्या दहा वर्षांपासून बंद आहेत, त्या खात्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश काढले आहेत. केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम.नागराजू यांनी देशातील बँकांना केवायसी करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. केवायसीसाठी मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम या सुविधांचा वापर करता येईल. री-केवायसीची प्रक्रिया सुरु करुन खाते अद्ययावत सुरु करण्याबाबत वित्तीय सेवा सचिवांनी सांगितलं आहे
अवश्य वाचा : ‘जातीयवादाकडे निवडणूक नेण्यासाठीच योगींना महाराष्ट्रात आणले जातय’- शरद पवार
ऑनलाइन केवायसी कशी कराल? (Jan Dhan Yojana)
आपल्या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग पोर्टलवर लॉग इन करा.
‘KYC’ टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा.
ऑन-स्क्रीन दिसणाऱ्या माहिती प्रमाणे आपली माहिती, त्यात आपले नाव, पत्ता आणि जन्म तारीख समाविष्ट करा.
आधार, पॅन आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. आपल्या सरकारी ओळखपत्र कार्ड्सच्या दोन्ही बाजू स्कॅन करा.
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. आपल्याला सेवा विनंती क्रमांक प्राप्त होईल आणि बँक आपल्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे प्रगतीबद्दल अपडेट करेल.
काही प्रकरणांमध्ये,आपली KYC कागदपत्रे अपडेट करण्यासाठी आपल्याला बँक शाखेत भेट देणे आवश्यक ठरू शकते.