Labor Code : कामगारविरोधी ‘लेबर कोड’ रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार

Labor Code : कामगारविरोधी 'लेबर कोड' रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार

0
Labor Code : कामगारविरोधी 'लेबर कोड' रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार
Labor Code : कामगारविरोधी 'लेबर कोड' रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार

Labor Code : संगमनेर : केंद्र सरकारने लागू केलेले नवीन चार लेबर कोड (Labor Code) हे कामगारांचे शोषण करणारे आहे. ते तत्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी संगमनेरमध्ये विविध कामगार संघटनांनी (Labor Organization) आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरूवार (ता. १२) फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुका तंबाखू (जर्दा) कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist Party of India) आणि किसान सभेच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जुने कायदे मोडीत काढल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०२५ मध्ये अस्तित्वात आलेले हे चार लेबर कोड भांडवलदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या फायद्यासाठी आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर कामगारांनी प्रदीर्घ लढा देऊन मिळवलेले २९ महत्त्वपूर्ण कायदे रद्द करून सरकारने कामगारांच्या हक्कावर गदा आणली आहे. किमान वेतन, बोनस, पेन्शन आणि ई.एस.आय. यांसारख्या सामाजिक सुरक्षा देणाऱ्या कायद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

नक्की वाचा: शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात; तीन शिक्षकांसह विद्यार्थी जखमी

Labor Code : कामगारविरोधी 'लेबर कोड' रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार
Labor Code : कामगारविरोधी ‘लेबर कोड’ रद्द करा; संगमनेरमध्ये विविध संघटनांचा एल्गार

‘मनरेगा’ योजनेबाबतही निवेदनात चिंता व्यक्त

नवीन कायद्यानुसार दिवसाचे १२ तास काम करण्याची मुभा मालकांना मिळणार असल्याने कामगारांचे शारीरिक व मानसिक शोषण होईल. कायमस्वरूपी रोजगाराची संकल्पना मोडीत काढून ठराविक कालावधीची नोकरी आणि कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ‘मनरेगा’ योजनेबाबतही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने मनरेगा योजना बंद करून त्याऐवजी आणलेली ‘बी. व्ही. जी. रामजी’ योजना मजुरांच्या रोजगाराचा कायदेशीर अधिकार हिरावून घेणारी आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच, जनसुरक्षा विधेयक मंजूर केले असले तरी शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आणि शेतमजूर दुहेरी संकटात सापडला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

अवश्य वाचा: आत्मनिर्भर असणे सुंदर असण्यापेक्षा जास्त महत्वाचे:  डॉ. भाग्यश्री टिळेकर

शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Labor Code)

या मोर्चाचे नेतृत्व तंबाखू कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे, सरचिटणीस कॉ. अ‍ॅड. ज्ञानदेव सहाणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रताप सहाणे, कॉ. भिका वाघ, किसान सभेचे अध्यक्ष कॉ. सयाजी कानवडे आणि सचिव कॉ. नारायण मेमाणे यांनी केले. सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.