नगर : बांधकाम व्यावसायिकांकडून बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या साहित्याचा दर्जा (Quality) लक्षात यावा, यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्स (Architect Engineers) अँड सर्व्हेअर्स संघटना आणि पुण्यातील स्ट्राँगटेक लॅबतर्फे नगर-दौंड महामार्गावर व्हीआरडीई समोर अरणगाव (ता. नगर) शिवारात प्रयोगशाळा (Laboratory) उभारली जात आहे. या प्रयाेगशाळेत सर्व साहित्य तपासून घेता येणार आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांमधील पारदर्शीपणा वाढणार आहे. त्यामुळं मेट्राेसिटी (Metrocity) तील ही सुविधा लवकरच नगरकरांना उपलब्ध हाेणार आहे.
बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. त्यातच अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम केल्यास इमारत कोसळण्याची शक्यता असते. इमारती कोसळल्याने जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. हे या लॅबमुळे टाळता येणार आहे. घराच्या बांधकामापूर्वी जमिनीखाली किती खोलीवर खडक आहे. सर्व बांधकाम साहित्य आदींची या प्रयाेगशाळेत तपासण्या केल्या जाणार आहे. नुकतेच या इमारतीचे प्रसिद्ध आर्किटेक्ट सतीश गुरव यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.