नगर : महाराष्ट्रातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana) ही सुरू झाल्यापासूनच कायम चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत ही योजना सरकारसाठी अगदी गेमचेंजर ठरली. त्यानंतर मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आणि निकषात न बसणाऱ्या किंवा या योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर बोजा आला आहे. मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही,असा खुलासा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne)यांनी केला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांची कपात
काय म्हणाले दत्तात्रय भरणे ? (Ladaki Bahin Yojana)
लाडक्या बहिणी योजनेमुळे सध्या तिजोरीवर बोजा पडत आहे. तरी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, याबाबत होत असलेली टीका योग्य नाही,असे राज्याचे अल्पसंख्यांक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी बद्दल अजित दादांनी भूमिका मांडली आहे,ती सरकारची भूमिका आहे,असे ते म्हणाले.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये उभारली गेली पुस्तकांची गुढी!
आजची परिस्थिती अवघड आहे. मात्र पुढे काय होईल हे सांगता येत नाही. शेतकरी आणि लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याच्या चर्चा सुरू आहे, मात्र असे काही होणार नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केलं. लाडक्या बहिणींनाही २१०० रुपये दिले जाणार असून तीही योजना बंद होणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं भरणे म्हणालेत.
‘नेत्यांनी बोलताना भान ठेवावं’ (Ladaki Bahin Yojana)
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या बराच वाद सुरू आहे. त्यावरही भरणे यांनी मत मांडलं. राज्यात,समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. समाजा-समाजामध्ये वाद होणं हे योग्य नाही. प्रत्येक नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे असा सल्लाही भरणे यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना दिला.