नगर : महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) नुकतीच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
नक्की वाचा : ‘विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव’;मुख्यमंत्र्यांचे विठुरायाचरणी साकडे
महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पेेसे जमा होणार (Mazi Ladki Bahin Yojana)
अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे. या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या योजनेचे पैसे रक्षाबंधन सणाला सगळ्या बहिणींना मिळणार आहे.
अवश्य वाचा : ‘झी मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा; मालिकेचा फर्स्ट लूक आला समोर
लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार (Mazi Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष १८ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल अॅपवर किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. तसेच ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
योजनेसाठी पात्रता निकष
महाराष्ट्र रहिवासी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे
६० वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल