नगर : महायुती सरकारने खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहेत.आता महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आहे.अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त तटकरे विधीमंडळात दाखल झाल्या होत्या.यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली.
नक्की वाचा : बापरे!संपत्तीसाठी मुलीची स्वतःच्या आईला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
आठ मार्चला मिळणार फेब्रुवारीचा हफ्ता (Ladki Bahin Yojana)

मंत्री आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या, “येत्या आठ मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होईल. खास महिला लोकप्रतिनिधिंसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. याशिवाय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरीत केला जाणार आहे.
अवश्य वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार हफ्ता (Ladki Bahin Yojana)
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्चला गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत”, असं त्यांनी सांगितलं.