Ladki Bahin Yojana : नगर : विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर केली होती. महायुतीच्या वतीने 7500 रुपये महिलांच्या खात्यांवर जमाही झाले होते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) 1500 रुपयांची ही रक्कम 2100 रुपये करणार, असे आश्वासन दिले होते. यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) अभूतपूर्व यश मिळाले. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना 2100 रुपये कधी पासून मिळणार याबाबत भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एका महिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
नक्की वाचा : कधी होणार यंदाचा महा कुंभमेळा? वाचा सविस्तर…
सुधीर मुनगंटीवार म्हणाले,
मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करु. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशाभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा होईल. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत.
अवश्य वाचा : मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात
ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत (Ladki Bahin Yojana)
आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. महायुतीतील एकही पक्ष आमच्या 2100 रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून 1500 रुपयांमध्ये वाढ करुन 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.