Ladki Bahin Yojana:अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

0
Ladki Bahin Yojana:अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
Ladki Bahin Yojana:अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

नगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मागील वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.निवडणुकीपूर्वी सगळ्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. या योजनेतील महिलांच्या अर्जाची छानणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या छाननीत अनेक गैरप्रकार समोर आलेले असतानाच २६५२ सरकारी महिला (2652 Government Women) कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा (Disadvantage) घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडून राज्य सरकार आता वसुली (Recovery) करणार असल्याची माहिती आहे.

नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा  

२६५२ महिलांनी घेतलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ (Ladki Bahin Yojana)

१ लाख २० हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. आणखी ६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची या योजनेत पडताळणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला १ लाख ६० हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध करून दिला होता. या डेटामधील यूआयडी मार्फत चौकशी केल्यानंतर २६५२ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

अवश्य वाचा : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला

या महिलांनी ऑगस्ट २०२४ पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या महिलांकडून ३ कोटी ५८ लाख रुपयांची वसुली करणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही,असे स्पष्ट असतानाही वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिलांनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. तर लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ७ लाख ७०  हजार महिलांचा हप्ता फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेता येणार नाही,हे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद असतानाही अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियम झुगारून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार,आतापर्यंत १ लाख २० हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात २६५२ महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीतून अनधिकृत रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी मिळून सुमारे ३ कोटी ५८  लाख रुपये उचलले आहेत. शासन आता ही रक्कम वसूल करण्याच्या तयारीत आहे. संबंधित विभागांना लवकरच वसुलीचे आदेश पाठवले जाणार आहेत.

शासन करणार रकमेची वसूली (Ladki Bahin Yojana)

आता ज्या २६५२ कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची वसुली करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाला त्या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.