Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार 

0
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार 
Ladki Bahin Yojana:मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार 

नगर : लाडक्या बहिणींना (Ladki bahin Yojana) आता मोठा दिलासा मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता (April installment) अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर ३० एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार ? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या ही वाढली होती.

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंबईतील वॉटर टँकर सेवा बंद होणार 

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु (Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली.जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही निकष लावले आहेत. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?  

कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही ? (Ladki Bahin Yojana)

महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या १. २० लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास ११ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here