Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महापालिकेतही गेमचेंजर ठरणार? कधी मिळणार डिसेंबरचा हफ्ता?

0
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महापालिकेतही गेमचेंजर ठरणार? कधी मिळणार डिसेंबरचा हफ्ता?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महापालिकेतही गेमचेंजर ठरणार? कधी मिळणार डिसेंबरचा हफ्ता?

नगर : डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारीचाही पहिला आठवडा संपत आला. तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात (Ladki Bahin Yojana) डिसेंबरचा हप्ता (December Installment) जमा झालेला नाही. मागच्या आठवड्यात मात्र नोव्हेंबरचे पैसे जमा झालेत. सध्या महापालिका निवडणुकीच्या (Municipal Elections) प्रचाराला वेग आला आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते म्हणजे तीन हजार रुपये मतदानाच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

नक्की वाचा:  बिनविरोध नगरसेवकांवर टांगती तलवार! नेमकं घडलयं काय ? 

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे. १४ जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील. कारण १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे तर १५ जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे. त्यापुर्वी महिलांना हे दोन हप्ते दिले जातील,अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. आता ती मुदत संपली असल्याने केवायी केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

अवश्य वाचा:  १५ जानेवारीला महाराष्ट्रात ‘पगारी सुट्टी’अनिवार्य; सुट्टी न दिल्यास होणार ‘ही’ कारवाई  
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सव्वाकोटी लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळत आहे. या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळतील,असं शासन निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात लवकर पैसे येऊ शकतात. १० ते १४ जानेवारीपर्यंत पैसे दिले जातील,असं सोलापूरच्या महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाच वेळी देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधी देखील मागितला असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीचे श्रेय महायुती घेणार का? (Ladki Bahin Yojana)

निवडणुकीच्या आधी पैसे जमा होत असल्याने, महायुतीमधील तीनही पक्षांकडून महिलांसाठी आम्ही ही योजना राबवत असल्याचं सांगत लाभ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्ष काही ठिकाणी एकत्र लढत आहेत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या योजनेचा श्रेय घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही मित्रपक्षांमध्ये चढाओढ लागणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्यावर महापालिकेच्या निकालावर याचा काय परिणाम होणार हे पाहावे लागेल.