Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

0
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार

नगर : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे, त्यामुळे कान देऊन ऐका. कारण तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ सुरु ठेवायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी नुकतीच मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ‘ई-केवायसी’ करण्याची मुदत (Term) देखील ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या हातात अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

नक्की वाचा: सोने- चांदीच्या दरात मोठी घसरण? काय आहे कारण?    

१८ नोव्हेंबर पूर्वी केवायसी करणे अनिवार्य  (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही ई-केवायसी सुविधा १८ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.आता ज्या लाभार्थी महिलांनी अजून देखील ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने अंतिम मुदत निश्चित केली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सगळ्या लाभार्थी महिलांना ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. नाहीतर त्यांचं नाव या यादी मधून कायमस्वरूपी वगळण्यात येईल. योजनेतील उर्वरित लाभार्थी भगिनींनी कोणत्याही अडचणींची वाट न पाहता, लवकरात लवकर आणि दिलेल्या मुदतीच्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

अवश्य वाचा: लवकरच साखरेच्या दरात वाढ होणार? देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे शिफारस 

आदिती तटकरे काय म्हणाल्या ? (Ladki Bahin Yojana)

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलीय. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. त्यामुळे उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.