Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवीन तारीख काय?

0
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवीन तारीख काय ?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ; नवीन तारीख काय ?

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ई केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनं मुदतवाढ देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी सांगितलं.

नक्की वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत

लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी (Ladki Bahin Yojana)

राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दरमहा १५०० रुपयांप्रमाणे महिलांना दिला जातो. आता लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

अवश्य वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?

भोंदू अशोक खरात प्रकरणी आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Ladki Bahin Yojana)

भोंदू अशोक खरात प्रकरणावरुन केली जाणारी टीका अतिशय दुर्दैवी आहे. ज्यावेळी हे प्रकरण झालं तेव्हा सर्व प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी मी एक होते, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या प्रमुख अनुभवी महिला पोलीस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. ज्या महिलांवर अन्याय झाला, पीडित महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे.