Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांसाठी ठरली डोकेदुखी;वाचा सविस्तर 

0
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांसाठी ठरली डोकेदुखी;वाचा सविस्तर 
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांसाठी ठरली डोकेदुखी;वाचा सविस्तर 

नगर : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सरकारची डोकेदुखी ठरू लागलेली असताना आता अंगणवाडी सेविकांनाही (Anganwadi Worker) मनस्ताप देणारी ठरत आहे. आधी सरसकट सगळ्यांनी फॉर्म भरा असं सांगणारं सरकार आता फेर तपासणी करा म्हणत आहे. त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्कील झालं आहे, आम्ही सर्वेक्षणाचं (Survey) काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

नक्की वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारची लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विविध कारणांनी तब्बल २६ लाख ३४ हजार महिला लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेला ताण, महिलांच्या ऐवजी पुरुषांनीच घेतलेला योजनेचा लाभ, योजनेत आत्तापर्यंत खर्च झालेला सरकारचा पैसा यावरून ही योजना चर्चेत आहे.

अवश्य वाचा : ‘राव बहादूर’चे पहिले पोस्टर प्रदर्शित;सत्यदेवचा दमदार आणि आगळावेगळा लुक समोर!  

अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणाच्या कामाला नकार (Ladki Bahin Yojana)

लाडक्या बहिणीचे फॉर्म सरसकट भरा सांगणार सरकारच आता फेर तपासणी करा म्हणत आहे. त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झाल आहे. आम्ही सर्वेक्षणाचे काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिण योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या कामाला विरोध करायला सुरुवात केली आहे. फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये, यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली होती. सुरुवातीला हे योजनेत फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक,तलाठी ,सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. गाव पातळीवर फेर सर्वेक्षणचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड होत असल्यामुळे या कामाला आता अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केला आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या नेमक्या काय ? (Ladki Bahin Yojana)

फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये, यासह इतर मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर  दरमहा पेन्शन देण्यात यावी, अंगणवाडी सेविकेला १५ हजार आणि मदतनीसला साडेआठ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाने यावेळी दिला आहे.