Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!जानेवारीचा हफ्ता जमा होण्यास सुरवात  

0
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!जानेवारीचा हफ्ता जमा होण्यास सुरवात  
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!जानेवारीचा हफ्ता जमा होण्यास सुरवात  

नगर : महायुती सरकारसाठी यशस्वी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana)लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग (January Installment Deposit) करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने (Women and Child Development Department) सोमवार (ता.२३) जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरवात झाली आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात २० लाख नागरिकांना पाच लाखांचे आरोग्यकवच  

लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जमा (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यासाठी १८ फेब्रुवारीला सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाला ९८ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती.ही रक्कम महिला व बाल विकास विभागाला मिळाल्यानंतर सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींच्या संख्येत घट? (Ladki Bahin Yojana)

डिसेंबर २०२५ महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळतंय.

अवश्य वाचा: गोळी लागली तरीही तो थांबला नाही,आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी!  

ई – केवायसी दुरुस्तीसाठी संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळं महिला लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. आता ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै २०२४ पासून जानेवारी २०२६ चा हप्ता विचारात घेतल्यास १९ हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये दिले जातात.