Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhymantri Majhi Ladki Yojana) जानेवारीच्या हप्त्याची रक्कम (Installment amount) लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात २६ जानेवारीपूर्वी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १ कोटी १० लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
नक्की वाचा : ऐकावं ते नवलच! नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी १ कोटी १० लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली. २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे.
अवश्य वाचा : लालपरीचा प्रवास महागला!आजपासून १५% भाडेवाढ
आतापर्यंत १०,५०० रुपये जमा (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै २०२४ पासून सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जानेवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ७ हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळेल. म्हणजेच एका लाभार्थी महिलेला १०,५०० रुपयांची रक्कम मिळालेली आहे. डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात २४ डिसेंबरला ही रक्कम वर्ग करण्यात होती. २ कोटी ५२ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात २४ जानेवारीला ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.