Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार 

0
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार 
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार 

नगर : लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) जुलैच्या हप्त्याची (Jully Installment) महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी (Scrutiny of applications) थांबवल्याची (Stopped) माहिती आहे. राज्यात येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची छानणी थांबवल्याची माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला असून जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.

नक्की वाचा :  नितीन गडकरी ठरले लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी!  

अर्जाची छाननी का थांबली? (Ladki Bahin Yojana)

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या १२ हप्त्यांची रक्कम महिलांना देण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला पात्र आहेत की अपात्र आहेत याची छाननी करण्यात येत होती. या योजनेचे निकष पूर्ण न करण्याऱ्या महिलांची नावं यादीतून वगळण्यात येत होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जर या महिला अपात्र ठरल्या तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास या अर्जांची छाननी होणार नाही,अशी माहिती आहे.  

अवश्य वाचा :  अभिनेता स्वप्निल जोशीच्या उपस्थितीत ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच   

छाननी पुन्हा कधी सुरु होणार? (Ladki Bahin Yojana)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ३४ लाख इतकी आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला ३५ ते ४० हजार कोटी रुपयांचा ताण पडत आहे.