नगर : लाडकी बहीण योजनेसंबंधी (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारने प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव ई केवायसी (E-KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत (Anganwadi Worker) ही प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
नक्की वाचा: अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच अहिल्यानगर युवा संसदेचे आयोजन
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ज्यांनी ई केवायसी केली नव्हती, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अनेक लाभार्थ्यांची ई – केवायसी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ताही मिळू शकला नव्हता. यासंबंधी अनेक तक्रारी आल्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत.
अवश्य वाचा: स्टॅन्डअप कॉमेडियन झाकीर खानचा मोठा निर्णय;पुढील ५ वर्ष ब्रेक घेणार
आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हणाल्या ? (Ladki Bahin Yojana)
वाशिममध्ये लाडक्या बहिणींचे आंदोलन (Ladki Bahin Yojana)
वाशिम जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणे बंद झाल्याचं चित्र आहे. त्यासंबंधी तक्रार करायला गेलेल्या महिलांचा संताप यावेळी पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याबाबत तक्रार मांडण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या होत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट नाकारण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनाला घेराव घालत जोरदार निषेध व्यक्त केला.



