नगर: लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारला मोठे यश मिळाले होते. ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. मात्र महापालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू झाली. यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे (Ladki Bahin Yojana Money) लाभार्थी महिलांना विलंबाने मिळाले, नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळाला तर डिसेंबरचा हप्ता (Installment) जानेवारीमध्ये मिळाला. मात्र जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेलं असतानाच आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे, त्यामुळे लाडक्या बहीणींची चिंता वाढली आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख ठरली!
लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिला आक्रमक (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. महापालिकेची निवडणूक संपूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अमरावतीमध्ये लाभार्थी महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या आहेत. आचारसंहिता संपली, ई -केवायसी देखील केली. मात्र अजूनही डिसेंबरचा हप्ता न मिळाल्यानं महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. लाडक्या बहिणींनी आता आंदोलनालास सुरुवात केली आहे.
अवश्य वाचा: महापौर पदाची निवड नेमकी कशी होते ? जाणून घ्या सविस्तर…
वाशिममध्ये नेमकं काय घडलं ? (Ladki Bahin Yojana)
वाशिममध्ये देखील हीच स्थिती आहे. वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील योजनेचे पैसे न मिळाल्याने चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. इ केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांनी आक्रमक होत आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. पैसे द्यायचे तर सर्वच बहिणींना द्या, नाही तर योजना बंद करा,अशी मागणी यावेळी या महिलांनी केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समस्या समजून घेतली. हिंगोलीमध्ये देखील लाडक्या बहिणी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील महिलांनी देखील पैसे मिळत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालायात मोठी गर्दी केली होती.



