Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळण्यास सुरवात 

0
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळण्यास सुरवात 
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळण्यास सुरवात 

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana)पैसे खात्यात कधी जमा होणार याची वाट महिला पाहत असताना अखेर आजपासून फेब्रुवारी (February Installment) महिन्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळं हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये मिळतील. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार (Decrese) आहे.

नक्की वाचा :  CBSE बोर्डाचे दहावीच्या परीक्षेबाबत नवे धोरण;वर्षातून दोनदा होणार परीक्षा 

अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला निधी वर्ग (Ladki Bahin Yojana)

फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजुनेच्या वितरणासाठी ३४९० कोटी रुपयांचा निधी अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येईल. फेब्रुवारी महिना संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना हा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा :  मोठी बातमी!संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती  

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष लावण्यात आले होते. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात राज्य शासनानं २ कोटी ४६ लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात २ कोटी ४१ लाख महिलांना लाभ देण्यात आला. म्हणजेच जानेवारी महिन्या ५ लाख महिलांची संख्या घटली होती. त्यानंतर महिला व बाल विकास विभागानं केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी ४ लाखांनी घटल्याची माहिती आहे. त्यामुळं साधारणपणे २ कोटी ३७ लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मिळतील.

लाडक्या बहिणींची संख्या का घटली ?(Ladki Bahin Yojana)

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरु करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये अर्ज भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. मात्र राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here