Lahu Kanade : निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती : कानडे

Lahu Kanade : निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती : कानडे

0
Lahu Kanade : निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती : कानडे
Lahu Kanade : निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती : कानडे

Lahu Kanade : श्रीरामपूर : खरतर निवडणूक त्याच दिवशी हातातून गेली होती, ज्या दिवशी ऐनवेळी कॉंग्रेस पक्षाने (Congress) विश्वासघाताने आपलं तिकीट कापलं. परंतू उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पाठबळ दिल आणि आपल्याला तिकीट दिल, परंतु उशीर झाला होता. कॉंग्रेस पक्षाने अगोदरच सांगितल असत तर ही वेळच आली नसती. विजय सोपा झाला असता, असे प्रतिपादन माजी आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांनी केले. श्रीरामपूर शहरातील नगरसेवक, ग्रामीण भागातील व राहुरी तालुक्यातील ३२ गावातील कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी संपर्क कार्यालयात आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी माजी आमदार कानडे बोलत होते.

नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित

नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अरुण नाईक, अजित कदम, अमृत धुमाळ, माजी नगरसेवक अशोक कानडे, शहरातील नगरसेवक व विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा : देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी

कानडे म्हणाले, (Lahu Kanade)

मतदारसंघातील प्रत्येक गावात आपले संघटन आहे. यापुढील काळात ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून लढाविणार असल्याचे माजी आमदार लहू कानडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रहित व समाजहिताचा विचार घेऊन पुढे चालणारा पक्ष आहे. आणि मीही तोच विचार घेऊन आजपर्यंत चाललो आहे. मी राजकारणी नाही पण अभ्यासक आहे. राजकारण समाजासाठी करायचे असते, सत्ता चांगल्या कामासाठी वापराची असते. मतदारसंघातील मायबाप जनतेने मला पाच वर्षे संधी दिली. त्या आमदारकीचा उपयोग लोकांना त्रास देण्यासाठी केला नाही. तर समाजाच्या हितासाठी, मतदारसंघातील विकास कामांसाठी केला. कधीही गटातटाचा विचार केला नाही. कोणताही राजकीय वारसा नसताना एका गरीब कुटुंबातून आलेला माझ्यासारखा माणूस तुम्ही आमदार म्हणून मला विधानसभेत पाठविले . मागील पाचवर्षात मिळालेल्या संधीतून आपण मतदार संघात भरीव विकासकामे केली आहेत. आजपर्यंत कधीही भाग घेत नव्हतो, परंतु यापुढे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणूक मोठ्या ताकदीनिशी लढविणार तसेच प्रत्येक गावात, वार्डात राष्ट्रवादीची स्थापना करण्याची घोषणाही कानडे यांनी केली.
याप्रसंगी अजित कदम, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, पी.एस. निकम, अंकुश कानडे, बाबासाहेब कोळसे, राजेंद्र कोकणे, अक्षय नाईक, दादा मेहेत्रे, सचिन ब्राम्हणे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक राजेश अलग, महमद शेख, सलीम शेख, वैशाली चव्हाण, भाऊसाहेब मुळे, बाबासाहेब खोसरे, मल्लू शिंदे, निलेश भालेराव, विलास गोराणे, सागर कुऱ्हाडे, अमन शेख आदी उपस्थित होते.